Latest

नाशिक : कोयत्याने वार करणाऱ्या चौकडीला अटक

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड, चुंचाळे येथील घरकुल संकुल परिसरात शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाढदिवसानिमित्त केक कापत असताना आवाज होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत कोयता व चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की अंबड भागातील घरकुल परिसरातील संविधान चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शंकर अवचार तसेच त्याचा भाऊ दिनकर व मित्र संतोष मोरे हे गप्पा मारत होते. याच दरम्यान संविधान चौकात वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज होत असल्याने अवचार यांनी कार्यक्रम शांतपणे करा, असे सांगितले. याचा राग आल्याने संशयित विशाल कुऱ्हाडे, जगदीश सोनवणे, गणेश कांबळे, वैभव राजगिरे, कैलास सोनपसारे, श्याम जाधव या टोळक्याने संतोष मोरे यास डोक्यात कोयता व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शंकर अवचार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल कुऱ्हाडे, गणेश कांबळे, कैलास सोनपसारे, जगदीश सोनवणे यांना अटक केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT