Latest

Nashik News : तळेगाव अंजनेरीतील ‘त्या’ गर्भवतीचा मृत्यू

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाशिक तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील ज्योती रोहित खाटिकडे (19) या विवाहितेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याबाबत तिचे चुलते साहेबराव पगारे (रा. उमराळे, ता. दिंडोरी) यांनी फिर्याद दाखल केली असून ज्योतीचा मृत्यू सासरच्यांनी मारहाण केल्याने झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान ज्योतीला गुरुवारी (दि.28) पहाटे त्र्यंबकेश्वर येथे उपचारासाठी दाखल केले असता तिची अवस्था पाहून तिला नाशिक जिल्हा रुग्णलायात पाठवले. तेथे उपचार घेताना मृत्यू झाला. मयत ज्योती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजते. याबाबत ज्योतीचा पती रोहित कुंडलिक खाटिकडे (25, रा. तळेगाव अंजनेरी) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT