त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील हरसूल भागात गुरुवारी (दि. 23) दुपारी 4 च्या सुमरास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तहसीलदार श्वेता संचेती यांनी त्यास दुजोरा दिला असून याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेली नसल्याचे सांगितले आहे. हरसूल येथील ग्रामस्थांनी जमिनीला हादरे बसल्याचे सांगितले आहे. दुकानाचे काउंटर, घरातील कपाट आदी हादरल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर यांसह हरसूल भागात जमीन हादरली. शेतीकामांसाठी रानावनात असताना जमीन हादरली, असे अनेकांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर शहरात दुपारी 4 च्या सुमारास घरांना हादरा बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. गुरुवारच्या या धक्क्याने त्र्यंबक तालुका चांगलाच हादरला आहे.
हेही वाचा :