Latest

Nashik News : मनोज जरांगे पाटलांचे होणार जंगी स्वागत, मराठा बांधवांना आवाहन

गणेश सोनवणे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून १७ दिवस उपोषणाला बसलेले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी (दि. ९) नाशिक जिल्ह्यात येत आहेत. नाशिकहून येवला येथे नैताळेमार्गे सभेसाठी जाताना त्यांचे नैताळेत भव्य दिव्य स्वागत करणार असल्याची माहिती मराठा समन्वय समितीचे प्रवक्ते राजेंद्र बोरगुडे यांनी दिली. (Nashik News)

जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नैताळे येथील शेतकरी वाल्मीक बोरगुडे यांनी पाच दिवस उपोषण केले होते. त्यामुळेच जरांगे-पाटलांचे नैताळेत स्वागत करण्याचा कार्यकर्त्यांचा मनोदय होता. परंतु जरांगे-पाटीलच जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने मराठा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. स्वागताच्या नियोजनासाठी नैताळे येथील टेंभी नाका येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात सोमवारी सकाळी 8.30 ला जरांगे-पाटील हे नैताळे येथे येतील. त्यावेळी जेसीबीच्या साह्याने 100 किलो झेंडूच्या फुलांची उधळण करून फटाके व ढोल-ताशाच्या गजरात भव्य स्वागत होणार आहे. त्यासाठी नैताळे व रामपूर येथील सकल मराठा बांधवांची तयारी सुरू आहे. या नियोजन बैठकीसाठी नवनाथ बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, वैभव गाजरे, दत्तू भवर, अण्णा पाटील-बोरगुडे, वाल्मीक बोरगुडे, नैताळे सोसायटी चेअरमन देवीदास बोरगुडे, सदाशिव कोटकर, दिलीप घायाळ, संजय साठे, सोपान बोरगुडे, किशोर बोरगुडे, नितीन बोरगुडे, चिंतामण देवरे, सुनील बोरगुडे, योगेश बोरगुडे, राहुल बोरगुडे उपस्थित होते. (Nashik News)

मनोज जारंगे-पाटलांचे नैताळेत भव्य स्वागत होणार आहे. परिसरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

-राजेंद्र बोरगुडे, प्रवक्ते, मराठा आरक्षण समिती, नैताळे

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT