Latest

Nashik News : अंबड, सिडकोवासीय पासपोर्ट काढण्यात अग्रेसर, परदेशवारीसह शिक्षणासाठी संख्या अधिक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील अंबड, सिडकोतील रहिवाशांनी चालू वर्षात सर्वाधिक पासपोर्ट काढल्याचे पोलिस नोंदीवरून समोर येत आहे. औद्योगिक वसाहत, नोकरी, व्यावसायिक सेमिनार, सहल व शिक्षणाच्या हेतूने सर्वाधिक पासपोर्ट काढले जात आहेत. तर सर्वात कमी पासपोर्ट आडगाव व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काढण्यात आले आहेत.

शहरातून सन २०१८ ते २०२३ या कालावधीत दीड लाख नाशिककरांनी पासपोर्ट काढले आहेत. त्यापैकी एकही पासपोर्ट प्रस्ताव नाकारण्यात आलेला नाही. चालू वर्षात शहरातील ३४ हजार ७०४ नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज केले असून, त्यांचे पासपोर्टही आले आहेत. शहरातून दरवर्षी सरासरी २६ हजार ५०० नागरिक पासपोर्ट काढत आहेत. पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाच्या नोंदीनुसार चालू वर्षात सर्वाधिक पासपोर्ट अंबड पोलिसांच्या हद्दीतील नागरिकांनी काढले आहेत. त्यामध्ये परदेशातील शैक्षणिक संधी, करिअर व सहलींकरिता पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर उपनगर पोलिसांच्या हद्दीतील नागरिकांनी पासपोर्ट काढले असून, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनीही त्याखालोखाल पासपोर्ट काढले आहेत.

पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी स्वतंत्र पोलिस व यंत्रणा असल्याने नागरिकांनी अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांत 'व्हेरिफिकेशन' होऊन पासपोर्ट विभागाकडे पाठवले जात असल्याने पासपोर्ट काढण्याची प्रक्रियाही सुलभ झाली आहे.

यासाठी भासतेय पासपोर्टची आवश्यकता

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून पासपोर्टची मागणी होत असते. त्याचप्रमाणे व्यवसायातील संधीमुळेही नागरिक परदेशात जातात. त्यात सेमिनार, कंपनीकडून सहलींचे आयोजन, व्यवसाय वाढीसाठी अभ्यास दौरा किंवा इतर व्यवहारांसाठी पासपोर्ट काढण्यासाठी मागणी वाढत आहे. तसेच परदेशातील पर्यटन सुलभ व आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नागरिकांनाही पासपोर्टची आवश्यकता भासत आहे. तर अनेक जण भविष्यात कधीही परदेशात जाण्याची संधी मिळेल या इच्छेने पासपोर्ट काढून ठेवत असल्याचे चित्र आहे.

पोलिस ठाणेनिहाय पासपोर्ट वितरण

पोलिस ठाणेनिहाय पासपोर्ट वितरण

पोलिस ठाणे : पासपोर्ट

अंबड – ४,७६५

उपनगर – ४,२७६

गंगापूर – ४,०६३

मुंबई नाका – ३,७४४

इंदिरानगर – ३,५३०

पंचवटी – २,७९६

भद्रकाली – २,१५२

नाशिकरोड – १,९६५

सरकारवाडा – १,६६६

म्हसरूळ – १,५७०

देवळाली कॅम्प – १,५३०

सातपूर – १,४२८

आडगाव – १,२१९

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT