Latest

Nashik Igatpuri : ब्लास्टिंग सुरु असताना भला मोठा दगड तिच्या बाजूला येऊन पडला अन्…

गणेश सोनवणे

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील धामणी येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. रस्ता बनवण्यासाठी संबंधित कंपनीकडून येथे मोठ्या प्रमाणात सुरुंग लावून ब्लास्टिंग केले जात आहे. या ब्लास्टिंगमुळे येथील अनेक घरांना मोठे तडे गेले आहेत, तर अनेक घरांची पडझड झाली आहे. शुक्रवारी (दि.29) सकाळी ब्लास्टिंग सुरु असताना शिवाजी रघुनाथ भोसले यावर्षीय नात स्वरा बाहेर खेळत असताना तिच्या बाजुलाच १० ते १२ किलोचा भला मोठा दगड येऊन पडला. सुदैवाने स्वरा ही थोडक्यात बचावली. (Nashik Igatpuri)

गेल्या तीन वर्षांपासुन ब्लास्टिंगचे काम सुरु असल्यापासुन धामणीतील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. शुक्रवारी ही ब्लास्टिंग सुरु असताना शिवाजी भोसले, केशव भोसले, कचरू भोसले, संदीप भोसले, राधाकृष्ण भोसले, रमेश भोसले, गजीराम भोसले यांच्या घरांवर मोठ्या प्रमाणात दगड पडले, तर संदीप नामदेव भोसले यांच्या पोल्ट्रीफार्मवर दगड पडल्याने अनेक कोंबड्या दगावल्या. तसेच तीन वर्षांपासुन ब्लास्टिंगमुळे धामणीतील अनेक बंगल्यांच्या भिंतींना तडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. समृद्धीचे काम करणाऱ्या कंपनीकडुन नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा या कंपनीसह शासन दरबारी निवेदने दिली आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उत्तमराव भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली धामणीच्या ग्रामस्थांनी तीन दिवस आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र येथील ग्रामस्थांना कंपनीकडून आश्वासनापलीकडे अद्याप पर्यंत काहीच मिळाले नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT