Latest

नाशिक : घरघुती मिटरच्या वायरला आग लागून लाखोंचे नुकसान

अंजली राऊत
नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा 
नगरसुल येथील आमदार वस्ती लगत विकास जाधव यांच्या घरातील घरघुती मिटर पासून घरात जाणाऱ्या वायरला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
येवला तालुक्यातील नगरसुल येथील आमदारवस्ती लगत जगन मोरे व नाना मोरे यांचे शेत वाट्याने करुन उदरनिर्वाह करणाऱ्या  विकास (बापू) रंगनाथ जाधव, पत्नी, चार वर्षाची मुलगी असे कुटुंब वास्तव्यास आहेत. शनिवारी (दि.27) संध्याकाळी सातच्या सुमारास घरघुती मिटर पासून घरात जाणाऱ्या वायरीमुळे अचानक पेट घेतल्याने घराजवळील कुडाच्या भिंतीला आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरघुती सर्व वस्तू जळाल्यान संसार उघड्यावर आला आहे. सुरगाणा तालुक्यात मोरे यांची सासुरवाडी असून दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.28) त्यांच्या मेहुण्याचा विवाह असल्याने लग्नाचे LED TV, काॅट, गादी, शोकेस व फर्निचरसह आदी लग्नाची भांडी व कपडे आगीमध्ये जळाली. आग विझविण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी मदतीचा हात देवू केला. परंतु  आगीने रौद्ररुप धारण केल्साने घरघुगती वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT