Latest

Nashik Crime : दारुच्या नशेत विवाहितेवर दोन वेळा अत्याचार, संशयित पोलिसांच्या ताब्यात

गणेश सोनवणे

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- घराजवळ राहणाऱ्या विवाहित ५५ वर्षीय महिलेवर युवकाने दारूच्या नशेत दोन वेळा बलात्कार केल्याची घटना रविवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संशयिताने पीडितेला पोलिसांना कळविल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे भेदरलेल्या पिडीतेने सोमवारी (दि.४) फिर्याद दिल्यानंतर अवघ्या आठ तासांतच पळून जाण्याच्या तयारीतील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime)

मनोज उर्फ टिल्लू अण्णा पवार (२३, रा. नवनाथ नगर, शनी मंदिर मागे, पेठरोड, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याच परिसरात पिडीता वास्तव्यास असून ती गेल्या १५ दिवसांपासून आजारी असल्याने कामावर गेल्या नाहीत. रविवारी (दि.३) रात्री ८ वाजेच्या सुमारास पीडिता घराजवळ ओळखीच्या महिलेच्या घरी बोलण्यासाठी गेली असता संशयित टिल्लू दारूच्या नशेत तेथे आला व महिलेवर जबरदस्ती केली. आजारपणामुळे पिडीतेच्या शरीरात त्राण नसल्याने प्रतिकार करू शकली नाही. पिडीता कशीबशी आपली सुटका करून घरी गेली असता संशयित टिल्लूने पाठलाग करीत महिलेच्या घरी जाऊन पुन्हा बळजबरी केली.

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तात्काळ पथक तपासासाठी रवाना केले. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, महेश नांदूर्डीकर, पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस शिपाई कुणाल पचलोरे, वैभव परदेशी, गोरक्ष साबळे यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे संशयित शनि मंदिर परिसरात लपून बसला असून, फरार होण्याच्या तयारीत होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून टिल्लू यास शिताफीने अटक केली. याप्रकरणी अधिक तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक एस.एस. गावित करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT