हिवाळ्यात कसे जपाल मुलांचे आरोग्य?

हिवाळ्यात कसे जपाल मुलांचे आरोग्य?

पुणे : हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, वाहणारे नाक यांसारख्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढू लागतात. अशा वेळी योग्य औषधोपचार, आहार यातून मुलांचे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मुलांना दैनंदिन शारीरिक व्यायामासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. यामुळे सर्दीसह इतर आजार कमी होण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायामामुळे शरीराच्या संरक्षणास चालना मिळते. मुलांचा वारंवार होणार्‍या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

सायकल चालवणे, धावणे किंवा दोरी उड्यांसारखे व्यायाम करून घ्या. थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मुलांना इनडोअर खेळाचे पर्याय उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मुलांना संतुलित, पौष्टिक आहार मिळणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांना थंड हवामानात भूक लागत नाही, परंतु, त्यांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित पौष्टिक आहार द्या. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे संत्री, टोमॅटो, खरबूज, पपई आणि हिरव्या भाज्यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले अन्न आणि ब्रोकोली, फ्लॉवर, पुदिना आणि आले यांसारखे हायड्रेटिंग पदार्थ द्यायला विसरू नका.

काय काळजी घ्याल?

  • हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घाला. यामुळे थंडीपासून बचाव करता येईल.
  • सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी मुलांना साबणाने आणि पाण्याने वारंवार हात धुण्यास प्रोत्साहन द्या. शिंकताना खोकताना तोंडासमोर रुमाल धरायला सांगा.

थंडीत बद्धकोष्ठतेचा त्रास

हिवाळ्यात बद्धकोष्ठता आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी मुलांना हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. कोमट हळदीचे दूध प्यायला देणे हेदेखील हिवाळ्याच्या महिन्यांत प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news