Latest

नाशिक : विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अंजली राऊत

सिडको : पुढारी वृत्तसेवा

माजी नगरसेविका ज्योती शिंदे व बजरंग शिंदे यांच्यासह विविध पक्षांच्या 500 कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकारिणी नियुक्ती जाहीर करण्यात आली.

नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच असून, बहुजन समाज पार्टीचे माजी नगरसेविक ज्योती शिंदे व बजरंग शिंदे, संतोष जाधव, कैलास सोनवणे, विक्रम शिंदे, अप्पा वाड, अर्जुन ताटे, विशाल भदर्गे, अशोक वावळे, बलराज कोरे, भास्कर जाधव, भाऊसाहेब पवार, भीमा गायकवाड, देवीदास अहिरे, दिनेश गोटे, दुर्गेश शिंगोरे, लीलाबाई उगले, प्रमोद वाघमारे, राधाबाई शेख, राहुल नेतावते, राजू आव्हाड, रामदास पालवे, रमेश मोरे, रवि मोरे, शांताराम भवाटे, सुरेश पालवे, विशाल पवार, गौतम सोनवणे, रोशन शिंदे, गणेश शिंदे, प्रधान बुधा, एकनाथ वाघमारे, अशोक वावळे, सुनील बोरगे, लखन गायकवाड, प्रकाश साळवे, शेखर उबाळे, शंकर पालवे, संतोष पगारे, रामदास पालवे, योगेश पालवे, राजू पंचाळे, अशोक पवार, दीपक खिल्लारे, संगम दोंदे, पवन वानखेडे, पाराजी मुंडे, सागर प्रापगारे, प्रशांत रोकडे, विकी पाटील, कुणाल कापसे, रोहित रोकडे, निकेतन टोपले, किरण पाटील, उमेश घुले, मानस शिरसाठ, शेखर शिरसाट, मुकेश साळवे, कुणाल पगारे, अजय मोरे, सोनू बोकाने, विकास वाढले, पंकजा हिरे, किरण साताळे, राजू अहिरे, रोहित उत्कर, संदीप गायकवाड, ऋषिकेश टोपले, अजय बर्डे, अक्षय अहिरे, शुभम पीठे, रोशन जाधव, अनिकेत बागूल, सूरज शिंदे, प्रवीण जडे, नुकूल बनकर, शंकर बैसाणे, गौतम बैसाणे, बंडू जगताप, कृष्णा माळी, चेतन साळवे, नितीन जाधव, श्याम गायकवाड, मच्छिंद्र वानखेडे, विशाल भगवते, धीरज काळे आणि त्यांचे समर्थक तसेच विविध पक्षांच्या 500 हून अधिक कार्यकर्ते व नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.

महानगरप्रमुख अविनाश शिंदे, महासचिव संदीप काकडीज, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष वामनदादा गायकवाड, जितेश शार्दुल यांनी प्रवेशित सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. बजरंग शिंदे यांच्याकडे महानगर सचिव तसेच सातपूर विभागाचे अध्यक्ष अशी महत्त्वाची दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बजरंग शिंदे तसेच त्यांच्या समर्थकांचा प्रवेशसोहळा झाला. सातपूर विभागात पक्षाचे प्राबल्य वाढणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केल्याचे समजते. महानगरात आता सक्षम पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांची मजबूत फळी निर्माण झाली असून, कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी त्याला सामोरे जाण्यास वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याचे शिंदे यांनी सांगितले. नवीन लोक पक्षात आल्याने त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यासाठी पक्षाची महानगर विस्तारित कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली असून, डॉ. अनिल आठवले यांच्याकडे महानगर उपाध्यक्ष तसेच सिडको विभागीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. दामू पगारे यांच्याकडे उपमहानगरप्रमुख व मध्य विभागीय अध्यक्ष नाशिक अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे

नूतन कार्यकारिणी अशी..
दामू पगारे – महानगर उपाध्यक्ष, विशाल पारमुख व सुनील साळवे (उपाध्यक्ष), संजय साबळे (महासचिव), कल्याण खरात, अजय साळवे व किशोर महिरे (सहसचिव), मनोज जाधव (सदस्य).

पक्षाने सोपविलेली जबाबदारी मोठी असून, त्याची पूर्ण जाणीव आहे. पदास न्याय देण्याचा तसेच सिडकोत पक्ष विस्तार करण्याबरोबरच विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. – डॉ. अनिल आठवले

संजय साबळे महासचिवपदी
ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे यांच्याकडे प्रशासनाचा असलेला दांडगा अनुभव लक्षात घेता पक्षाने त्यांच्याकडे महासचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यामुळे महानगरात पक्ष संघटनवाढीस निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार पटल्याने पक्षीय बलाबलसाठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सातपूरमधून पक्षाचे किमान 10 नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारले असून, त्यात निश्चितच यशस्वी होणार आहे. – बजरंग शिंदे, महानगर सचिव, वंचित बहुजन आघाडी.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT