Latest

Nandurbar News : केळीच्या बागेत चोरी छुपे सुरु होती गांजाची शेती, पोलिसांकडून पर्दाफाश

गणेश सोनवणे

नंदुरबार ; नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून केळीच्या शेतातून तब्बल 2 क्विंटल 53 किलोचा गांजा जप्त केला. 17 लाख 74 हजार 626 रुपये इतकी त्याची किंमत सांगण्यात आली.

जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त अभियान सुरू केले असून अंमली पदार्थांची लागवड, शेती, वाहतूक इत्यादींवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ड्रोन व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून लक्ष ठेवले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, विसरवाडी, उपनगर या पोलीस ठाणे हद्दीला गुजरात राज्याची व शहादा, म्हसावद, धडगांव पोलीस ठाणे हद्दीला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. त्या अंतर्गतच दिनांक 02/11/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना शहादा पोलीस ठाणे हद्दीतील नवानगर गावात केळी पिकाचे शेतात ओल्या गांजाची बेकायदेशीर लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व त्यांचे एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने शेतात जाऊन छापेमारी करीत एकास ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण केळीचे शेत पिंजुन काढले असता तेथे संपूर्ण शेतातून 2 क्विंटल 53 किलो 584 ग्रॅम वजनाचे 17 लाख 74 हजार 626 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली. ताब्यात घेतलेला संशयित सुनिल मेरसिंग चव्हाण, वय-47 वर्षे, रा. नवानगर, ता. शहादा, जि. नंदुरबार याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस हवालदार संदीप गोसावी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, बापू बागूल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, शोएब शेख, दिपक न्हावी, यशोदिप ओगले, हेमंत वारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT