Bidri Sugar Factory | कोल्हापूर बिद्री साखर कारखाना निवडणूक : ४२ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद

Bidri Sugar Factory | कोल्हापूर बिद्री साखर कारखाना निवडणूक : ४२ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद
Published on
Updated on

बिद्री : पुढारी वृत्तसेवा :  बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी विविध गटात ८६२ उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरूवारी पात्र व अपात्र अर्जांची दिवसभर व रात्री उशिरापर्यंत छाननी सुरु होती. शुक्रवारी (दि.३) ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. छाननीनंतर विविध गटातील ४२ अर्ज अपात्र झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी सांगितले. (Bidri Sugar Factory)

'बिद्री' निवडणुकीसाठी २६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होवून १ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. गुरुवारी अर्ज छाननी करण्यात आली. दिवसभर चाललेल्या छाननीत कारखान्याच्या उपनिधीनुसार नामनिर्देश अर्जांची पडताळणी करण्यात आली. या छाननीत ५ पैकी किमान ३ हंगामात ऊस पुरवठा नाही, सभासद शेअर्स रक्कम थकबाकी असणे, गटाच्या मतदार यादीत नाव नसणे, चुकीचे अनुक्रमांक, सुचक, अनुमोदक यांची शेअर्स रक्कम भकबाकी व सह्या नसणे, अशा कारणामुळे ४२ अर्ज अपात्र ठरले आहेत. या छाननीवेळी गटनेते, बहुसंख्य उमेदवार , वकीलांची फौज उपस्थित होती. गटनेत्यांनी अर्जावर फारसा आक्षेप न घेता सबुरी घेतली होती.  विद्यमान संचालक मंडळ शाबूत असून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Bidri Sugar Factory)

सोमवारपासून उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. मधल्या दीपावलीच्या सुट्या वगळता माघारीसाठी केवळ सात दिवस मिळणार आहेत. त्यामुळे गटनेत्यांना माघारीसाठी विनवणी करून वेळेत माघार घेण्याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. १७ नोव्हेंबरलाच सायंकाळी पॅनेल रचना होवून १८ नोव्हेंबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. ३ डिसेंबरला मतदान होणार असून ५ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

अपात्रमध्ये भगवान पातले (पनोरी) भाजपचे समाधान म्हातुगडे, देवराज बारदेस्कर व आनामारी बारदेस्कर, (शेणगाव), माजी पं. स. सदस्य किरणसिंह पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील (येवती), माजी संचालक केशव पाटील मुलगा अमित पाटील (निढोरी), काँग्रेसचे राजू काझी यांच्या पत्नी इशरत काझी, शिवसेनेचे सुरेश चौगले (नरतवडे), करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील यांच्या पत्नी संध्या पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह ४२ अर्ज अपात्र ठरले आहेत. जरी प्रमुखांचे अर्ज अपात्र असले तरी स्वतः किंवा पत्नीचा, कुटुंबातील अर्ज पात्र ठरले आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news