Latest

Umesh Yadav : आयपीएलमुळे नागपूरकर उमेश यादवचेही फळफळले नशीब

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात नागपूरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे देखील पाच कोटींवर रुपयांची बोली लागल्याने नशीब फळफळले आहे. उमेश कोराडी रोड येथील रहिवासी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशांत वैद्यनंतर उमेश यादव या नागपुरातील खेळाडूचा भारतीय संघात समावेश झाला आहे, हे विशेष. या लिलावात उमेश यादवला विकत घेण्यासाठी अनेक संघांनी बोली लावली, पण गुजरात टायटन्सने बाजी मारली. Umesh Yadav

उमेश यादवला लिलावात मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघात घेण्यासाठी खूप धडपड केली, पण शेवटी गुजरातने त्याला 5. 80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सहभागी केले. विशेष म्हणजे नागपूरकर उमेश यादव दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. यादवने 2010 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून तो दरवर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. उमेश यादवच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 141 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.38 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 140 डावात 136 विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने आयपीएलमध्ये 50 डावात फलंदाजी करताना 196 धावा देखील केल्या आहेत. Umesh Yadav

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT