Latest

नागपूर: लाचखोरी प्रकरणी वैज्ञानिकाला ५ वर्षांची शिक्षा

Shambhuraj Pachindre

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : सीबीआय न्यायालयाने 1 तत्कालीन सी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सचे वैज्ञानिकाला लाचखोरीच्या प्रकरणात पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि 1.10 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष न्यायाधीश सीबीआय नागपूर यांनी बिपिन जांभोळकर (वैज्ञानिक संवर्ग अधिकारी – ग्रेड-ए, तत्कालीन वैज्ञानिक-सी (लॉट सेल), नोडल अधिकारी, अंमलबजावणी आणि कायदेशीर क्रियाकलाप, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) नागपूर ),  यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लाचखोरी प्रकरणात 5 वर्षे सश्रम कारावास आणि 1.10 लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

सीबीआयने दि. 9 मार्च 2015रोजी बिपीन जांभोळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दि. 20 डिसेंबर 2014 रोजी न्यायदंडाधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार आरोपीने त्यांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध अपील न केल्याने तक्रारदारास 15 हजार रुपये दिले होते. यामध्ये त्यांनी लाच मागितली आणि स्वीकारली प्रकरणात तपासानंतर सीबीआयने २६ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. खटल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान, फिर्यादीकडून 15 साक्षीदार तपासण्यात आले आणि 91 कागदपत्रे सादर केली गेली. परिणामी आरोपीला दोषी ठरविण्यात आले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT