Latest

चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध मंगेश देशमुख लढत ; ९८ टक्के मतदान

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी (Nagpur Election) आज ९८.९३ टक्के मतदान झाले. एकूण ५६० मतदार या निवडणुकीत होते. मतदान संपेपर्यंत ५५४ मतदारांनी आपला मताधिकार बजावला. एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले होते. ५ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर (Nagpur Election) आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक झाली.

अकोला, वाशिम, बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध मंगेश देशमुख असा सामना झाला. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला.

नागपूरमध्ये भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे तर भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकडून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र,मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात आज भाजपचं वर्चस्व दिसले.

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT