विधानपरिषद निवडणूक : बेळगाव विधानपरिषदेसाठी चुरशीने ९९.९७ टक्के मतदान | पुढारी

विधानपरिषद निवडणूक : बेळगाव विधानपरिषदेसाठी चुरशीने ९९.९७ टक्के मतदान

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागेसाठी आज चुरशीने आणि शांततेने मतदान पार पडले. 8 हजार 849 पैकी 8 हजार 846 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण 99. 97 टक्के मतदान झाले.

मतदानासाठी जिल्ह्यामध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी 118 मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. या ठिकाणी हत्यारबंद पोलिस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्व मतदान केंद्रांमध्ये सॅनिटायझर, आणि स्क्रीनींग करून मतदारांना आत पाठवण्यात येत होते. अनेक ठिकाणी एका पक्षाचे उमेदवार समुहाने येऊन मतदान करत होते.

उचगावसह अनेक मतदान केंद्रांमध्ये सकाळी दहा पूर्वीच शंभर टक्के मतदान झाले होते. मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांना सायंकाळी चार पर्यंत मतदान केंद्रातच बसावे लागले.

दोन जागेसाठी एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी भाजपाचे आ. महांतेश कवटगीमठ, काँग्रेसचे चंन्नराजन हट्टीहोळी, अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यातच खरी लढत आहे. या निवडणूकीची मतमोजणी 14 डिसेंबर रोजी चिकोडी येथे होणार आहे.

हेही वाचा

Back to top button