Latest

Nagpur BJP : मोदींचा, ओबीसींचा अपमान खपवून घेणार नाही : भाजपचे राहुल गांधीविरोधात आंदोलन

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मनात ओबीसींबद्दल कायम असलेली घृणा ही वेळोवेळी ते मांडत असतात. यातूनच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा ओबीसी समाज असेल, यांच्याविरुद्ध नेहमीच ते बोलतात. नेहरू -गांधी कुटुंब नेहमीच ओबीसी विरोधी राहिले आहे, महाराष्ट्रात मोदींचा किंवा ओबीसींचा अपमान भाजप खपवून घेणार नाही, असा इशारा आज (दि. ९) देण्यात आला. Nagpur BJP

भाजप नेत्यांनी राहुल गांधीविरोधात नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यावेळी आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, अशोक धोटे, अर्चना डेहनकर, बाल्या बोरकर, प्रगती पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहीत पारवे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, रोहित मुसळे, महेश दिवसे, दिलेश ठाकरे, डॉ. प्रिति मानमोडे, नरेश मोटघरे, जयप्रकाश गुप्ता, श्रद्धा पाठक, नरेंद्र धनोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Nagpur BJP

काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. अशावेळी ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्प आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करीत पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ते म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चिड दिसून येते. संपूर्ण ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. शनिवारी (दि. १०) राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT