Sharad Pawar Press Conference : पीएम मोदींच्या नेहरूंवरील विधानावर शरद पवारांकडून नाराजी, म्हणाले.. | पुढारी

Sharad Pawar Press Conference : पीएम मोदींच्या नेहरूंवरील विधानावर शरद पवारांकडून नाराजी, म्हणाले..

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sharad Pawar Press Conference : भारतात लोकशाहीची सुरुवात नेहरूंनी केली. त्यांचे योगदान देशात मोठे आहे. नेहरूंचे योगदान नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा चुकीचा आहे. दिवंगत नेत्यावर टीका करणे हे बरोबर नाही. त्यामुळे पीएम मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत केलेल्या भाषणाने मला दु:ख झाले आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, भारताचे नाव जगात पोहचवण्यासाठी नेहरूंनी काम केले. विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये नेहरूंचे योगदान मोठे आहे. त्यांच्यासह इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही देशासाठीचे काम केले आहे. अशा महान नेत्याचे कार्यकर्तृत्व नाकारणे चुकीचे आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात. एका पक्षाचे नसतात’, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button