Latest

नगर : रोहित पवारांनी राम शिंदेंना दाखवला कात्रजचा घाट; कर्जतमध्ये राष्ट्रवादी-काॅंग्रेसचे वर्चस्व

backup backup

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : कर्जत (नगर) नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने 17 पैकी 15 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा या ठिकाणी मोठा पराभव झाला. भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 12, काँग्रेस 3 आणि भारतीय जनता पक्ष २ अशा जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने संपूर्ण शहरांमध्ये प्रचंड जल्लोष केला. कर्जत नगरपंचायत (नगर) 17 जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळवली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे चार जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सुरुवातीला बारा जागांसाठी मतदान झाले, तर काल चार जागांसाठी मतदान झाले.

आज सकाळी कर्जत तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीस सुरूवात झाली. या निवडणुकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली मात्र अवघ्या दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांनी मौन धारण करत आमदार रोहित पवार यांच्या दडपशाहीच्या विरोधात आंदोलन केले आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील मतदारांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वावर याठिकाणी विश्वास व्यक्त केल्याचे दिसून आले.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT