Latest

Naga Chaitanya : घटस्फोटानंतर दाेन वर्षांनी नागा चैतन्यची सामंथावर प्रतिक्रिया, म्‍हणाला…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता नागा चैतन्य ( Naga Chaitanya ) त्याच्या आगामी 'कस्टडी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून याच दरम्यानच्या एका मुलाखतीत नागा चैतन्य त्याच्या पर्सनल लाईफबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. यावेळी नागा चैतन्यने अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटोबद्दल प्रथमच  प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता नागा चैतन्यची ( Naga Chaitanya ) सोशल मीडियावरील एका पोस्टमधून सामंथाच्या घटसफोटाबाबतची माहिती समोर आली आहे. मुलाखतीत पहिल्यांदा नागाला चित्रपटातील अनेक गमंतीजमतीबाबत प्रश्न विचारण्यात आले. यानंतर हळूहळू नागाला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारले गेले. खास करून त्याला सामंथाच्या घटस्फोटाविषयी विचारण्यात आलं.

यानंतर नागा चैतन्यने म्हटलं की, 'आम्ही विभक्त होऊन दोन वर्षे पूर्ण झाली असून, घटस्फोटाची पूर्ण प्रक्रिया वर्षभरापूर्वी पार पडली आहे. न्यायालयाने आमचा घटस्फोट मंजूर केला आहे. घटस्फोटानंतर आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. मला माझ्या आयुष्यातील त्या काळाची खूपच आठवण येते. सामंथा खूप प्रेमळ मुलगी आहे. तिने तिच्या आयुष्यात आनंदात राहावे हीच माझी इच्छा आहे. परंतु, घटस्फोटादरम्यान आमच्याबद्दल ज्या चर्चा झाल्या त्याचा त्रास झाला. त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. '

नागा चैतन्य आणि समंथाने गोव्यात २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले होते.ऑक्टोबर २०२१ मध्ये त्‍यांनी घटस्‍फाेट घेत असल्‍याची घोषणा केली होती. यानंतर नागाचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी जोडलं गेले. 'मजिली', 'ये माया चेसावे' आणि 'ऑटोनगर सूर्या' या चित्रपटात नागा- सामंथाने एकत्रित काम केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT