Latest

मुंबई : पवई येथे जलवाहिनी फुटली, मध्य आणि दक्षिण मुंबईत पाणीकपात

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पवई येथे 900 मिली मीटर व्यासाची जलजोडणी (Water Pipeline) आज शुक्रवारी सकाळी अचानक फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यानंतर पालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने जलजोडणी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. हे काम सुरू झाल्याने मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. हे काम पुर्ण होईपर्यत म्हणजेच 12 नोव्हेंबर सकाळी 11 ते 13 नोव्हेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत पाणीकपात राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जलवाहिनी (Water Pipeline) फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणारे विभाग

जी दक्षिण विभाग – वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग.

जी उत्तर विभाग – माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी.

डी विभाग – लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग.

ए विभाग – कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी.

हे ही वाचा :

व्हिडिओ पहा :

कोरोना उपचारावरील वाढता खर्च : मेडिक्लेमचे काय आहेत पर्याय ?

SCROLL FOR NEXT