Latest

मुंबई : घाटकोपर बेस्ट डेपाेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप; चाकरमान्यांना बसणार फटका

निलेश पोतदार

घाटकोपर; पुढारी वृत्‍तसेवा बेस्ट च्या घाटकोपर डेपो मधील कंत्राटी चालक आज (बुधवार) सकाळ पासून अचानक ससंपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करीत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या कंत्राटी कामगारांनी हा संप केला आहे.

मात्र याचा फटका चाकरमान्यांना बसणार आहे. घाटकोपर बस डेपो येथून मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात बेस्ट च्या बसेस जातात. तसेच किमान सात बस डेपो मध्ये हा संप सुरू होईल अशी माहिती कामगारांनी दिली आहे. त्यामुळे सकाळीच जे चाकरमाने कामाला निघतील किंवा शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील त्यांना या संपामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT