Latest

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांकडून नोटीस

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन : रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ८ जूनला वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पोलिसांकडून त्यांना देण्यात आले आहे.

हनुमान चालीसा प्रकरणावरून पोलीस रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या घरी गेले होते. तेव्हा पोलिसांशी राणा दाम्पत्याने हुज्जत घातली होती. त्यावेळी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात राण दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला असल्याने या प्रकरणी अति. मुख्य महानगर दंडाधिकारी ९ वे न्यायालय वांद्रे या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ८ जुनला न्यायालयात हजर रहावे अशी नोटीस राणा दाम्पत्याला पाठवण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT