Latest

Mumbai News : सोळा महिन्यांच्या बाळाला पाळणाघरात बेदम मारहाण

सोनाली जाधव

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वाशी येथील एका पाळणाघरात अवघ्या १६ महिन्यांच्या बाळाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याप्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. वाशी शहरातील स्मार्ट थॉटस् डे केअर सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाळाला मारहाण केलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांन याबाबत एनसी दाखल केली आहे परंतु या प्रकरणी संबंधितांवर गुन्ह दाखल करून दोषीवर कडक कारवा करण्यात यावी, अशी मागण पालकांनी केली आहे. (Mumbai News)

सीसीटीव्ही फुटेजनुसार, स्मा थॉटस् डे केअर सेंटरमध्ये १६ महिन्यांचा चिमुकला खुर्चीवर बसल आहे. टेबलावर त्याच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले जाते. यावेळी बाळ त्य ताटातील चमचा घेण्याचा प्रयत्न करत असताना तेथील आयाने त्याच्या थोबाडीत मारली आणि खुर्चीवरून उचलून बाजूला ठेवते. बाळाला मारल्याने ते रडत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. घरी आल्यावरही बाळाचे रडणे थांबत नसल्याने पालकांना संशय आला. त्यामुळे पालकांनी डे केअर सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची मागणी केली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शाळेमधील हा प्रकार समोर आला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT