Latest

Mumbai News : मुंबईत क्रुरतेचा कळस; लिव्ह इन पार्टनरची हत्या, मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये वाटले

सोनाली जाधव

मिरारोड : पुढारी वृत्तसेवा : मिरारोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून करवतीने मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या संदर्भात मुंबईचे डीसीपी जयंत बजबळे यांनी एएनआय या वृत्तवाहिनीला माहिती दिली. (Mumbai News)

Mumbai News : करवतीच्या साहाय्याने तुकडे केले

पोलिसांच्या माहितीनूसार,मिरारोड परिसरात आकाशगंगा इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन वर्षांपासून मनोज सहानी (वय ५६) व सरस्वती वैद्य (वय ३२) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी नयानगर पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा उघडताच महिलेचा अर्धा मृतदेह आढळून आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपी सहानी याला ताब्यात घेतले. आरोपीने करवतीच्या साहाय्याने तुकडे करून काही तुकडे नष्ट केल्याचे चौकशीदरम्यान उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रेशर कुकरमध्ये  उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा

आरोपी मनोज सहानी हा सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी  प्रेशर कुकरमध्ये टाकून उकळायचा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचा. बारीक केलेले अवयव पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी मनोजने वापरलेल सगळ सामान आणि बाईक पोलिसांनी बुधवारी (दि.७) रात्री पोलिसांनी जप्त केलं आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT