Beed News : मेव्हणीच्या प्रेमात अडकलेल्या दाजीची बायकोला मारहाण | पुढारी

Beed News : मेव्हणीच्या प्रेमात अडकलेल्या दाजीची बायकोला मारहाण

केज; गौतम बचुटे : भावाच्या मेव्हणी सोबत सूत जुळवून तिच्याशी गुटूर्गू सुरू असल्याने बायकोने समजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नवऱ्याने मेव्हणीच्या मदतीने चक्क बायकोला मारहाण केली. त्यानंतर मात्र प्रेमाचे रंग उधळणाऱ्या नवऱ्याला नातेवाईकांनी चांगलेच धुतले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील तरुणाचे त्याच्या भावाच्या मेव्हणी सोबत अनैतिक संबंध होते. त्या दोघा दाजी-मेव्हणीचे ‘ते’ चाळे माहीत झाल्याने त्याच्या पत्नीने समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या ‘त्या’ चुलत मेव्हणीने (दि. ६ जून) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चक्क घरात घुसून तरुणाच्या बायकोला म्हणजेच बहिणीला मारहाण केली. तसेच ती तिला म्हणाली की, आम्ही दोघे आता लग्न करणार आहोत. मेव्हणीच्या या मारहाणीनंतर संबंधित दाजी म्हणजेच तरुणाने देखील आपल्या बायकोला मारहाण केली. मेव्हणीसाठी त्याने बायकोचे केस धरून डोके भिंतीवर आपटले. यात बायकोचे डोके फुटून गंभीर जखमी झाली.

दरम्यान या घटनेनंतर दाजी-मेव्हणीच्या मधुर संबंधाची माहीती सर्वांना समजली. या भांडणाची कुणकुण लागताच भावाच्या मेव्हणीच्या नादी लागलेल्या दाजीची (दि. ६ जून) सायंकाळी ५:०० च्या सुमारास तिच्या नातेवाईकांनी चांगलीच धुलाई केली.

या संबंधित प्रकरणातील तरुणाच्या बायकोने दिलेल्या तक्रारीवरून तिचा नवरा आणि त्याची प्रेमिका मेव्हणी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर मेव्हणीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या दाजीच्या तक्रारीवरून त्याचा मेव्हणा, साडू आणि इतर दोघा विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश आघाव हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Back to top button