Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरपूरकरिता वर्धा विभागातून ५९ स्पेशल बसेस; आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विशेष सुविधा | पुढारी

Pandharpur Ashadhi Ekadashi : पंढरपूरकरिता वर्धा विभागातून ५९ स्पेशल बसेस; आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विशेष सुविधा

वर्धा; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाद्वारा श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणार्‍या भाविकाकरिता जादा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरिता ५९ बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. २३ जूनपासून विशेष बसगाड्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पंढरपूर मार्गावर वर्धा विभागातील सर्वच आगारातून बसेस सोडण्याचे  नियोजन एस. टी. महामंडळाकडून करण्यात आले आहे. (Pandharpur Ashadhi Ekadashi 2023)
गावकरी समूह, वारकरी समूह, भजनी  मंडळ, मंदिर समिती या सारख्या समूहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरिता अ‍ॅडव्हान्स बुकिंगची सोय विभागातील सर्वच बस्थानकावरून करून देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला  सन्मान योजनेतर्गत देय असलेल्या तिकीट दराचे सवलतीसह अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भाविकांनी सदर जादा बसेस सेवेचा लाभ घेण्यासाठी आगार प्रमुख, बस स्थानक प्रमुख यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pandharpur Ashadhi Ekadashi 2023)
वर्धा आगारातून 24, आर्वी आगारातून 12, हिंगणघाट 15, तळेगाव 3 व पुलगाव आगारातून 5 अशा 59 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. वर्धा ते पंढरपूर करीता पूर्ण तिकीट 905 रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी 455 रुपये आहे. आर्वी ते पंढरपूर पुर्ण तिकीट 895 रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी 450 रुपये, हिंगणघाट ते पंढरपूर पुर्ण तिकीट 1 हजार 60 रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी 530 रुपये, तळेगाव ते पंढरपूर पुर्ण तिकीट 950 रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी 480 रुपये व पुलगाव ते पंढरपूर पुर्ण तिकीट 890 रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी 450 रुपये आकारण्यात येणार आहे.

Back to top button