Latest

Mumbai News: पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने, मुंबईत दोघांना अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शने केल्याप्रकरणी मुंबईतील मानखर्द येथून दोघांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करत, पोलिसांना दोघांनाही ताब्यात घेतले यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याची परवानगी मागितल्याबद्दल चार जणांना ताब्यात घेतले असल्‍याचे वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'ने केले आहे. (Mumbai News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सभेची कोणतीही पूर्वपरवानगी न देता १० ते १५ युवक शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घटनास्थळी जमले. त्‍यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. यानंतर कारवाई करत पोलिसांनी मुंबईतील मानखुर्द येथून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि निदर्शने करणाऱ्या दोघा युवकांना ताब्यात घेतले आहे. (Mumbai News)

संबंधित बातम्या:

रुचीर लाड आणि सुप्रीत रविश अशी आहे अटक केलेल्‍यांची नावे आहेत. या दोघांवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत बेकायदेशीरपणे एकत्र येणे, लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करणे आणि सार्वजनिक सेवकावर बळाचा वापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दर (Mumbai News)

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या युवकांना परिसरात रॅली काढण्याची किंवा निषेध करण्याची परवानगी नव्हती. त्यांनी आम्हाला सार्वजनिकरित्या एकत्र येण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली असती, तरी त्यांना आझाद मैदानात आंदोलनासाठी जाण्यास सांगण्यात आले असते, कारण यापुढे शहरात इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारच्या उपक्रमांना परवानगी नाही." असेदेखील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आंदोलनाचे आयोजक असलेल्या रिव्होल्यूशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या (RWPI) चार जणांना आंदोलनापूर्वी परवानगी मागितल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. एकाला माटुंगा येथून तर इतर तीन जणांना मानखुर्द येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाई करत, तिघांना फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC), 1973 च्या कलम 151 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले, परंतु त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. दरम्यान पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, महाराष्ट्र यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून अटकेचा निषेध केला आहे. पोलिसांकडून दादर स्टेशन आणि आझाद मैदानाबाहेर आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा :
SCROLL FOR NEXT