Latest

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने राशिद खान, पोलार्डच्या खांद्यावर सोपावली नवी जबाबदारी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमधील यशस्वी संघ म्हणून रिलायन्स ग्रुपची मालकी असलेल्या मुंबई इंडियन्सकडे सर्व क्रिकेटप्रेमींची नजर जाते. क्रिकेट विश्वाचा भाग म्हणून रिलांयन्स परिवाराने जगाच्या पाठीवर चालणाऱ्या विविध क्रिकेट लीगमध्ये गुंतवणूक करत फ्रॅंचाईजी विकत घेतली आहे. २०२३ साली सुरू होणाऱ्या यूएई आंतरराष्ट्रीय लीग आणि द. आफ्रिकामध्ये सुरू होणाऱ्या टी-२० लीगमधील संघ रिलांयन्सने खरेदी केले आहेत. (Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सने दोन्ही संघांसाठी कर्णधारांच्या नावाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या टी 20 लीगमध्ये एमआय केपटाऊन हा संघ तर, यूएईमध्ये होणाऱ्या क्रिकेट लीगमधील एमआय एमिरेट्स संघाची मालिकी घेतली आहे. एमआय केपटाऊन संघाच्या कर्णधारपदाची धुरा अफगानिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर यूएईमधील एमआय एमिरेट्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. (Mumbai Indians)

याबाबत मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून घोषणा केली. कायरन पोलार्ड हा गेली १३ वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात कायम केले. आयपीएलमधून निवृती जाहीर केल्यानंतर ही तो यूएई येथे होणाऱ्या टी-२० लीगमध्ये एमआय एमिरेट्स संघाची धुरा निभावताना दिसणार आहे.

द. आफ्रिकेमध्ये सुरू होणाऱ्या टी-२० लीगमध्ये एमआय केपटाऊन संघाचा कर्णधार म्हणून अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानकडे जबाबदारी देण्यात आली आहे. राशीद खानने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद व‌ गुजरात टायटन्स या संघांकडून खेळला आहे. तसेच राशीद खान जगभरात होणाऱ्या विविध टी-२० लीगमध्ये सहभागी होत असतो. एमआय केपटाऊन संघात राशिदसोबत आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, इंग्लंडचा सॅम करन व लियाम लिव्हिंगस्टोन तसेच दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांचादेखील समावेश आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT