Latest

मुंबईत गौरी-गणपतीच्या 65 हजार मूर्तींचे विसर्जन

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाला गौरीसह काल (सोमवार) मोठ्या उत्साहात वाजत- गाजत गुलालाची उधळण करीत निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळपासूच या विसर्जनाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ६५ हजार ४६ गौरी गणपतीचे विसर्जन झाले. यापैकी कृत्रिम तलावात 17 हजार 617 गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईत ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन झाल्यानंतर प्रथम दीड दिवसांच्या व नंतर पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी सहा दिवसांच्या अर्थात गौरी गणपतीला निरोप देण्यात आला. यासाठी गणेश भक्तांनी नैसर्गिक व कृत्रिम तलाव आदी विसर्जनस्थळी गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती. दादर, जुहू, गिरगाव आदी चौपाटींसह तलाव, खाडी या नैसर्गिक विसर्जन स्थळासह १५२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेसह पोलीस इतर संस्था आदींच्या माध्यमातून सेवा सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.

मुंबईतील समुद्र चौपट्या तसेच अन्य नैसर्गिक सार्वजनिक 429 घरगुती 41 हजार 340 बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. 6 हजार 260 गौरीचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 174 तर घरगुती 15 हजार 265 गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच 2 हजार 178 गौरीचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT