Latest

मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व दुरुस्तीकरिता 9 मे रोजी बंद

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मान्सूनपूर्व दुरुस्तीकरिता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ( Mumbai Airport ) दोन्ही धावपट्ट्या 9 मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्ट्यांची देखभाल करण्यात येणार आहे. या काळात विमान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विमान वाहतूक सुरू होईल.

संबंधित बातम्या 

जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक म्हणून मुंबई विमानतळाला ओळखले जाते. दोन धावपट्ट्यांंपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला सुमारे 46 विमानांचे आगमन व उड्डाण होते; तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला सुमारे 35 विमानांचे उड्डाण व आगमन होते. सध्या दररोज सुमारे 950 विमानांची ये-जा होते. मुंबई विमानतळ हे सुमारे 1033 एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. पावसाळ्यात देखील हवाई वाहतूक सुरळीत राहण्यासाठी धावपट्ट्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते.

धावपट्टी देखभालीच्या कामाच्या वार्षिक सरावामध्ये इंजिनीअरिंग आणि एअरसाईड टीम्समधील तज्ज्ञांचा समावेश असतो. त्याच्या सहाय्याने दैनंदिन ऑपरेशन्समुळे उद्भवलेल्या सूक्ष्म टेक्स्चर आणि मॅक्रो टेक्स्चर झीज आणि एअरसाइड स्ट्रिप मजबूत करण्यात मदत करण्यासाठी धावपट्टीच्या पृष्ठभागाची तपासणी केली जाते. पावसाळ्याच्या चार महिन्यांत मुंबई विमानतळावरुन जवळपास 93 हजार विमानांद्वारे अंदाजे 11 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक होते. ( Mumbai Airport )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT