Latest

Flood Relief : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटींचा निधी

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जून, जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे (Flood Relief)  शेती पिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे अश्वासन दिले.

या बैठकीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून ३ हजार ५०१ कोटींचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने त्यानूसार शासन निर्णय जारी केला आहे. (Flood Relief)

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी १३६०० प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT