Latest

चीनी मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित फर्मसवर ईडीचे छापे ; देशभरात ४४ ठिकाणी झाली कारवाई

नंदू लटके

नवी दिल्ली :पुढारी वृत्तसेवा
चीनी मोबाईल कंपनी विवो आणि त्याच्याशी संबंधित विविध फर्मसवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी एकाचवेळी छापे टाकले. देशभरातील ४४ ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती 'ईडी' सूत्रांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ईडीने शाओमी कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली होती.

चीनी मूळ असलेल्या कंपन्यांच्या कामकाजाची छाननी करण्याचे मागील काही काळात वाढलेले आहे. गेल्या मे महिन्यात झेडटीई तसेच विवो मोबाईल कम्युनिकेशन यांच्या कामकाजाचा तपास करण्यात आला होता. आर्थिक अनियमिततेच्या संदर्भात ही चौकशी झाली होती. दुसरीकडे मागील काही काळापासून शाओमी कंपनी ईडीच्या रडारवर आहे. विवो कंपनी मालकी तसेच आर्थिक उलाढालीसंदर्भात चुकीची माहिती देत असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे, त्यातून मंगळवारी देशाच्या विविध भागात छापे टाकण्यात आले आहेत.

वर्ष 2020 मध्ये चीनने लडाख सीमेवर आगळीक केली होती. तेव्हापासून चिनी कंपन्यांवर तपास संस्थांचे विशेष लक्ष आहे. गलवानमध्ये चीनने भारतीय सैनिकांवर हल्ला केल्याच्या काही महिन्यांनंतर भारत सरकारने टिकटॉकसहित दोनशे ऍप्सवर बंदी घातली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT