व्हिडिओ: " काय नदी, काय घागरी, काय पाणी, सगळं कसं..." हुपरीतील युवकांचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

व्हिडिओ: " काय नदी, काय घागरी, काय पाणी, सगळं कसं..." हुपरीतील युवकांचा व्हिडिओ व्हायरल

हुपरी; अमजद नदाफ: आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी,  काय डोंगार, काय हाटील” या डायलॉगची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता हुपरीतल्या काही युवकांचा व्हिडिओ सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. हुपरी शहरात मेघराजाच्या आगमनासाठी पाळक पाळण्यात आला. यासाठी पंचगंगा नदीवर घागरीने पानी आणण्यासाठी पायी गेलेल्या युवकांचा “काय नदी, काय घागरी, काय पाणी, सगळ कसं ओक्के हाय…”  असे म्हणणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला असता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पावसाने जून महिना कोरडाच घालवला त्यामुळे  मेघराजाच्या आराधनेसाठी  ५ मंगळवारी पाळक पाळण्याचा निर्णय़ हुपरी ग्रामस्थांनी घेतला .आज ५ जुलै रोजी पहिला पाळक पाळण्यात आला. यामध्ये पंचगंगा नदीला पायी चालत जाऊन पाणी आणून ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेसह देवदेवतांना जलाभिषेक करुन पाळक पाळण्यात येतो. या काळात शहरातील सर्व व्यवहार बंद असतात.

आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. अशा पावसात भक्तानी पंचगंगा नदीवर जाऊन अत्यंत भक्तीभावाने जलाभिषेकसाठी पाणी आणले. यावेळी काही युवकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला त्यात “काय नदी, काय घागरी, काय पाणी…” असा उल्लेख करीत, महाराष्ट्रातील सत्तातर नाट्य़ातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची आठवण करुन देणारा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्याची शहरात प्रचंड चर्चा आहे.

पाहा व्हिडिओ:

 

हेही वाचा:

Back to top button