Latest

मुलायमसिंग यादव यांची प्रकृती चिंताजनक

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आलेले समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांची प्रकृती जास्तच बिघडली आहे. यादव यांना जीवन रक्षक औषधे दिली जात असल्याचे मेदांता रुग्णालयाकडून रविवारी सांगण्यात आले.

82 वर्षीय मुलायमसिंग यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर गेल्या आठवड्यात मेदांतामध्ये हलविण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. दुसरीकडे मुलायमसिंग यांची प्रकृती स्थिर असून चाहत्यांनी रुग्णालयाकडे येऊ नये, असे आवाहन यादव कुटुंबियांकडून करण्यात आले होते. मुलायमसिंग यांना याआधी  जून महिन्यात मेदांता रुग्णालयात नेण्यात आले होते. चेकअप करुन त्यांना त्यावेळी डिस्चार्ज देण्यात आला होता.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT