Latest

Yuvraj Singh-MS Dhoni: जब मिल बैठे दो यार! युवराज-एमएस धोनीमध्ये पॅचअप

रणजित गायकवाड

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Yuvraj Singh-MS Dhoni एक काळ असा होता की युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांच्या मैत्रीच्या चर्चा होत होत्या. मात्र काही काळापासून या दोघांबद्दलच्या बातम्यांमुळे त्यांच्यात आता ते जुने नाते राहिले नसल्याचे दिसून येत आहे. पण सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला पुन्हा एकदा कॅप्टन कूल आणि सिक्सर किंगच्या मैत्रीची आठवण होईल. युवराज सिंगने (Yuvraj Singh) इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याची चर्चा रंगली आहे.

Yuvraj Singh-MS Dhoni: जब मिल बैठे दो यार! युवराज-एमएस धोनीमध्ये पॅचअप

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) त्याचा जुना सहकारी युवराज सिंगची भेट घेतली (Yuvraj Singh-MS Dhoni). युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर धोनीला भेटतानाचा फोटो शेअर केला, जो पाहताच व्हायरल झाला. युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक बूमरँग शेअर केला आणि त्यात एमएस धोनीला टॅगही केले. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे दोन्ही माजी खेळाडू एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोन्ही खेळाडू सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलतांना दिसत आहेत. (Yuvraj Singh-MS Dhoni)

युवराज सिंग आणि एमएस धोनी (MS Dhoni) हे भारतीय क्रिकेटचे दोन लोकप्रिय चेहरे आहेत. या दोन्ही क्रिकेटपटूंनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघासाठी अनेक सामने एकत्र जिंकले. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पहिला T20 विश्वचषक विजेता बनवण्यात दोघा क्रिकेटपटूंचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 2011 मध्ये या दोघांनी 28 वर्षांनंतर भारतीय संघाला वनडे फॉरमॅटमध्ये विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. (Yuvraj Singh-MS Dhoni)

युवराज सिंगने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 104 एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्याने 88.21 च्या स्ट्राइक रेटसह सहा शतके आणि 21 अर्धशतकांसह 3077 धावा केल्या. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत युवराजला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' घोषित करण्यात आले. त्या संघाचे नेतृत्व धोनीच्या करत होता. या वर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी युवराज सिंगने टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत आपले फोटो शेअर केले होते पण त्यात धोनीचे फोटो नव्हता. 2011 च्या विश्वचषकाच्या विजयापासून संघातील खेळाडूंसोबतचे फोटो दिसत होते. या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, मोहम्मद कैफ आणि टीम इंडियाचे अनेक खेळाडू दिसतात. मात्र धोनी त्यात नव्हता. यानंतर दोघांच्या मैत्रीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

2004-17 दरम्यान, युवराज आणि धोनी या दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाच्या मधल्या फळीला भक्कम केले. एकेकाळी त्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवले. युवराज सिंगची कारकीर्द 2000 ते 2017 पर्यंत राहिली. धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आणि 2019 मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT