पुढारी ऑनलाइन डेस्क : सातत्य, कष्ट आणि आई-बाबांच्या पाठिंब्याने मी आज यशाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी (DYSLR) निवड झालेली ऐश्वर्या नाईकची ही प्रतिक्रिया आहे. ऐश्वर्या मूळची हळदी (ता.करवीर) गावची. सध्या ती बाबांच्या नोकरीनिमीत्त कोल्हापुरात वास्तव्यास आहे. पहिल्या प्रयत्नात तिने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदावर तिने यश मिळविले होते. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला देते.
पदवीपासूनच ऐश्वर्याने अभ्यासाला सुरुवात केली होती. तिने ठरवल होतं मला प्रशासकीय सेवेत जायचं आहे. त्यामुळे पदवीचा अभ्यास करत स्पर्धा परिक्षांचा अभ्यासालाही सुरुवात केली. सातत्य, नियोजन आणि आई-बाबांचा पाठिंब्याने मी हे माझ स्वप्न पूर्ण केले, असं ऐश्वर्या सांगते. बाबांची ईच्छा होती की सेट परिक्षाही द्यावी. कोरोना काळात परिक्षांना विलंब झाला त्या काळात अर्थशास्त्र विषयातून सेट परिक्षा पास झाले. ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक, तर आई गृहिणी आहे. प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाल्यावर तिने कोल्हापुरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. घरात खेळाचे वातावरण. ऐश्वर्याही उत्कृष्ट अॅथलेटिक्स व स्विमिंगमधील राष्ट्रीय खेळाडू आहे. ऐश्वर्या सांगते मला इथपर्यंत नाही थांबायचं आहे. मला क्लास वन अधिकारी व्हायचं आहे. मी माझा अभ्यास सुरुच ठेवणार आहे.
काल दिनांक ३१ मे रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला. मुख्य परिक्षा ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. त्यानुसार एकूण २०० पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात आली. या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले (बैठक क्रमांक PN005337) हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून, तर रूपाली गणपत माने (PN002157) या महिलांमधून तसेच गिरीश विजयकुमार परेकर (PN002362) हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. त्याचबरोबर आयोगाने काल महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादीही जाहीर केली.
हेही वाचलंत का?