Latest

काँग्रेसला भगदाड पडणार? अनेक खासदार आणि मंत्री भाजपच्या संपर्कात

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या भागात वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. वास्तविक, काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्री, खासदार आणि आमदार 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. येत्या काही दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून राज्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबचे अनेक खासदार, कॅबिनेट मंत्री, आमदारांसह अनेक नामवंत व्यक्ती भाजपच्या संपर्कात आहेत. यामध्ये बहुतांश काँग्रेसचे लोक सामील असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि नॅशनल सोशालिस्ट काँग्रेसच्या लोकांचादेखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात चार पंजाबी गायकही भाजपसोबत हातमिळवणी करू शकतात.

बदलाचे खरे कारण काय आहे?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि काँग्रेसमधून बाहेर पडणे हे या बदलाचे मूळ असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेस हा त्यांचा नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यानंतर भाजपने कॅप्टन अमरिंदर यांच्या पक्षासोबत युती करून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

117 जागांवर निवडणूक होणार

पंजाबमधील 117 जागांपैकी भाजप 80-85 जागांवर निवडणूक लढवू शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष 20 ते 25 जागांवर निवडणूक लढवू शकतो, काही जागा सुखदेव सिंग धिंडसा यांच्या पक्षाला जातील. लवकरच संपूर्ण युती निश्चित होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT