Latest

Mount Merapi Volcano: इंडोनेशियातील माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ७ किमी उंचीवर गेला राखेचा फुगा

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात सक्रिय ज्‍वालामुखींमधील एक इंडोनेशिया (Indonesia) मधील माऊंट मेरापी ज्‍वालामुखी (Mount Merapi Volcano) चा शनिवारी उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की, या उद्रेकातून निर्माण झालेले गरम राखेचे ढग तब्‍बल ७ किमी पर्यंतच्या उंचीवर पोहोचले. यामुळे या ज्‍वालामुखीच्या जवळील गावांवर राखेचे थर पसरले. प्रशासनाने येथील नागरिकांना सुरक्षीत स्‍थळी हलवले.

या ज्‍वालामुखीच्या स्‍फोटामुळे जवळपासच्या गावांवर राखेचा पाऊस झाला. या भीषण आणि शक्‍तीशाली स्‍फोटातून निर्माण झालेली राख आणि धुराचा फुगा जवळपास ७ किमी पर्यंत उंचीपर्यंत पोहोचला. यावरून या स्‍फोटाची तीव्रता लक्षात येते. दरम्‍यान या घटनेत कोणाचीही जीवितहानी झाल्‍याचे वृत्‍त नाही. मात्र आसपासच्या गावातील नागरिकांना आणि पर्यटकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे.

इंडोनेशियाची सांस्‍कृतीक राजधानी याग्‍याकार्ताजवळ स्‍थित असलेल्‍या जावा व्दीप जवळील या ज्‍वालामुखीची उंची 9737 फूट इतकी आहे. ज्‍वालामुखीच्या स्‍फोटानंतर स्‍थानिक प्रशासनाने लोकांना या परिसरातून दूर जाण्यास सांगितले आहे. दरम्‍यान सध्या या घटनेत नुकसानीचा अंदाज लावणे कठीण असल्‍याचे प्रशासनाने म्‍हटले आहे.

येथील लोकांना यातून बाहेर पडणाऱ्या राखेचा त्रास होत आहे. त्‍यातच ज्‍वालामुखीच्या तप्त मातीचा प्रवाह गावाकडे येण्याचा धोका आहे. हे यावेळी होणाऱ्या पावसामुळे होउ शकते. कारण ज्‍वालामुखीच्या स्‍फोटानंतर नेहमी पाऊस होत असतो. ज्‍वालामुखीच्या जवळ आठ गाव आहेत. जेथे राखेचा पाऊस झाला आहे. याच ज्‍वालामुखीचा दोन वर्षापूर्वी स्‍फोट झाला होता. त्‍यावेळी तब्‍बल २८ दिवस तप्त लाव्हारस बाहेर फेकत होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT