पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने अपहरण केलेल्या मिया शेम या तरुणीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. जेरुसलेमने सोमवारी (दि. १६) व्हायरल केलेल्या व्हिडिओनंतर मियाच्या आईने मियाला वाचवण्याची विनंती केली आहे. मियाच्या आईने पत्रकार परिषदेत 'मी भीक मागते, माझ्या मुलीला परत आणा' अशी आर्त हाक दिली आहे. (Hamas Hostage Video)
इंडिपेंडंट संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केरेन शेम असे मिया शेमच्या आईचे नाव आहे. केरेन शेम या एक फ्रेंच-इस्त्रायली टॅटू कलाकार आहेत. त्यांना त्यांच्या मुलीचा म्हणजेच मियाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गहिवरुन आले. मियाच्या व्हिडिओनंतर तिच्या आईचा व्हिडिओ आज व्हायरल झाला. या व्हिडिओतून केरेन शेम यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मुलगी मिया शेम हिला वाचवण्यासाठी मदतीची "भीक" मागितली आहे. (Hamas Hostage Video)
मिया शेम शनिवारी (दि. ७) सकाळी गाझा सीमेजवळच्या मित्रासोबत संगीत महोत्सवात गेली होती. यावेळी ते दोघेही बेपत्ता झाले. मिया शेम हिचे अपहरण करण्यात आले. अपहरण झाल्यानंतर मियाच्या आईने हमासने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये मियाला पहिल्यांदा पाहिले. अपहरण झाल्यानंतर त्यांनी मियाला पहिल्यांदा पाहिले. यावेळी आपली मुलगी जिवंत असल्याची खात्री केरेन यांना झाली. ही खात्री झाल्यानंतर केरेन या "किंचाळल्या आणि जमिनीवर पडल्या".
इंडिपेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, मियाने तिच्या आईला "ते आमच्यावर गोळीबार करत आहेत" असा संदेश पाठवलेला होता. या संदेशानंतर केरेन यांनी मुलीला वाचवण्याची मागणी करत असताना म्हटले की, 'मी भीक मागते, माझ्या मुलीला परत आणा'. मियाच्या या आईच्या या विनंतीनंतर मियाला वाचवण्याबाबत प्रयत्न करावेत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात आहेत.
हमासने इस्रायलवर केलेल्या रक्तरंजित हल्ल्यादरम्यान सुपरनोव्हा संगीत महोत्सवातून मियाचे अपहरण केले. फ्रेंच-इस्त्रायली मीयाचे वय २१ वर्षे आहे. या व्हिडिओत मीयाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. एक डॉक्टर तिच्यावर वैद्यकीय उपचार करत आहेत. यामध्ये तिच्या हाताला बॅडेड गुंडाळताना दिसून येते. यानंतर ती स्वत: कॅमेऱ्यासमोर बोलते.
हेही वाचा