Latest

Pune Metro : पुणे मेट्रोमध्ये सगळे बिहारीच! यावर अजित पवार म्हणतात…

अमृता चौगुले

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहोळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्यापूर्वी त्यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास करत असताना अजित पवारांनी मेट्रोमधील काही प्रवाशांबरोबर संवाद साधला. त्यावेळी अजित पवार एका तरुणीला म्हणाले, तुम्ही आजपर्यंत मेट्रोने किती वेळा प्रवास केला. कुठे काम करता, त्यावेळी ती महिला प्रवाशी म्हणाली की, मी एका ऑफिसमध्ये काम करते. पण दादा मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, मी पुणे मेट्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता. पण मला नोकरी मिळाली नाही. इथे सर्व बिहारी लोकच भरले आहेत. अशी पुणे मेट्रोमधील नोकर भरतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच तक्रार केली. अजित पवार आणि या तरुणीचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवारांनी महामेट्रोचे सीईओ यांना सुनावले

तरुणीने अजित पवार यांच्याकडे अशी तक्रार केल्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न केला. हे खरं आहे का? आपण कोणताही प्रकल्प करताना स्थानिक तरुणांना संधी देतो. जर स्थानिकांना संधी दिली नाही, तर त्यांच्यामध्ये रोष पाहण्यास मिळतो, अशा शब्दात अजित पवार यांनी महामेट्रोचे सीईओ श्रावण हर्डीकर यांना सुनावले. पण त्यावर मेट्रोचे सीईओ यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आले नाही. या वेळी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी रुबीपासून ते वनाजपर्यंत येणार्‍या सर्व स्टेशनची वैशिष्ट्ये सांगितले. तसेच प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा आणि मेट्रो स्टेशनमध्ये असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT