Latest

पुढील वर्षी 5.5 टक्के विकासदर साध्य होण्याचा ‘मुडीज’ चा अंदाज

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये जीडीपी दर 5.5 टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज जागतिक स्तरावरील पतमापन संस्था मुडीजने वर्तविला आहे. सदर वर्षात 4.8 टक्के जीडीपी दराचा अंदाज याआधी मुडीजने वर्तवला होता. थोडक्यात आधीच्या अंदाजात मुडीजने सुधारणा केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्चाच्या तरतुदीमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. आणि जीडीपी दर साडेपाच टक्क्यांवर जाईल, असे मुडीजने आपल्या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षातील जीडीपी दराचा अंदाज मात्र या संस्थेने कमी केला असून चालू वर्षी सात टक्क्यांच्या तुलनेत 6.8 टक्के इतका विकासदर साध्य होईल, असे मुडीजने म्हटले आहे.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT