Latest

Monu Manesar : नूह हिंसाचार आणि जुनैद-नासिर हत्याकांडातील मुख्य आरोपी मोनू मानेसरला अटक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : नूह हिंसाचार आणि जुनैद-नासिर हत्याकांडातील मुख्य आरोपी मोनू मानेसरला (Monu Manesar) नूंह पोलिसांनी मंगळवारी नाटकीय पद्धतीने अटक केली आहे. 28 ऑगस्ट रोजी नूह येथील दुसऱ्या जलाभिषेक यात्रेच्या दोन दिवस आधी मोनूने त्याच्या फेसबुक पेजवर एक भडकाऊ पोस्ट टाकली होती, असा आरोप आहे. किरकोळ कलमान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात नूह पोलिसांनी मोनूला अटक केली.

नूह हिंसाचारानंतर हरियाणातील शेतकरी आणि जाटांनी मोनू मानेसरच्या अटकेची मागणी लावून धरली होती. तर जुनैद-नासिर हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून राजस्थान पोलिसांनाही तो हवा आहे.

Monu Manesar : राजस्थान पोलिसांना दिली माहिती

किरकोळ कलमान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात नूह पोलिसांनी मोनूला अटक केली. मोनूवर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये कमाल शिक्षा फक्त तीन वर्षे आणि दंड आहे. मोनूला लगेच जामीन मिळणार हे पोलिसांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी राजस्थान पोलिसांना याची माहिती दिली. यामुळेच दुपारी बारा वाजता अटक करण्यात आलेल्या मोनूला पोलिसांनी काही तासांतच न्यायालयात हजर केले. तेथून राजस्थान पोलिसांनी आरोपीला प्रोडक्शन वॉरंटवर सोबत नेले.

हरियाणातील नूह येथे सोमवारी (दि.३१ जुलै) विश्व हिंदू परिषदेच्या  शोभा यात्रेदरम्यान हिंसाचार झाला. यानंतर मागील दोन दिवस राज्‍यातील अनेक भागात हिंसाचाराचे लोण पसरले. या प्रकरणात  मोनू मानेसर हा तरुण चर्चेत आला आहे. तो गुरुग्राममधील (हरियाणा) मानेसरचा रहिवासी आहे. २८ वर्षीय मोनूचे खरे नाव मोहित यादव आहे. तो बजरंग दलाशी संबंधित असून गोरक्षक (Monu Manesar) म्हणून काम करत असल्याचे देखील समोर आले आहे.

काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील भरतपूर येथील जुनैद-नासीर याचा मृतदेह भिवानीमध्ये जळालेल्या कारमध्ये सापडला होता. मोनू हा जुनैद-नासिर हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. या यात्रेपूर्वी मोनू याने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये त्याने नूहच्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचा दावा करत, त्यांच्या समर्थकांनाही यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, त्यांच्या निवेदनातील विधानावरूनच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार (Monu Manesar) भडकल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT