Nuh Violence Bittu Bajrangi: नूह हिंसाचार प्रकरण; संशयित आरोपी बिट्टू बजरंगीला १४ दिवसांची कोठडी

पुढारी ऑनलाईन: हरियाणातील नूह हिंसाचारातील संशयित आरोपी बिट्टू बजरंगी याच्या न्यायालयीन कोठडीत आज (दि.१७) पुन्हा वाढ झाली. एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर नूह जिल्हा न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने बिट्टू बजरंगी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Nuh Violence Bittu Bajrangi) सुनावली आहे. असे वृत्त एएनआयने दिले आहे.
हरियाणामधील नूह येथे ३१ जुलै रोजी धार्मिक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचार प्रकरणी बजरंग दलाचा नेता राज कुमार उर्फ बिट्टू बजरंगी याला मंगळवारी (दि.१५) संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. त्यानंतर त्याला बुधवारी (दि.१६) न्यायालयासमोर हजर केले असता, एका दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर आज (दि.१७) बिट्टू बजरंगी याला जिल्हा न्यायालयाकडून १४ दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. बिट्टूसह अन्य १५-२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला काल नूह पोलिसांनी अटक (Nuh Violence Bittu Bajrangi) केली होती.
#UPDATE | Bittu Bajrangi has been sent to 14-day judicial custody https://t.co/YmYgFTuFdH
— ANI (@ANI) August 17, 2023
Nuh Violence Bittu Bajrangi : हिंसाचार भडकावल्याचा आरोप
नूह पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (दि.१५) सदर नूह पोलीस ठाण्यात एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगी विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी कृती करणे, सरकारी सामुग्रीचे नुकसान करण्याचे आरोप आहेत. याप्रकरणी त्याच्यावर दंगल आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, एफआयआरमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल विविध आयपीसी कलम आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत इतर 15-20 व्यक्तींची नावे नोंद आहेत.