Latest

Monsoon withdrawal: ५ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून माघारी फिरणार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य राजस्थानातून कालपासून (दि.२५ सप्टेंबर) मान्सून परतीला सुरूवात झाल्याची माहिती पुणे विभागाचे प्रमुख डॉ. के.एस. होसाळिकर यांनी त्यांच्या 'X' वरून दिली आहे. तसेच महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता असून, यावेळीपासून राज्यातील मान्सून परतीच्या प्रवासाला निघेल( (Monsoon withdrawal), असे देखील पुणे हवामान विभागाने म्हटले आहे. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला आहे. तर कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (Monsoon withdrawal)

दरवर्षी ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २५ जूनला दाखल झाला. त्यानंतर जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. दरम्यान सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मान्सून परतीच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात हलका पाऊस सुरूच आहे. मात्र कालपासून (दि.२५ सप्टेंबर) परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. राजस्थानातील नैऋत्य भागातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. (Monsoon withdrawal)

Monsoon withdrawal: शनिवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

उत्तर अंदमान समुद्रावर आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराला लागून शनिवारपर्यंत (दि. ३० सप्टेंबर) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू तीव्र होण्याच्या शक्यतेसह पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण देशातून नैऋत्य मान्सून परतीला सुरूवात होणार आहे. (Monsoon withdrawal)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT