पुढारी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने यावर्षी मान्सूनचे प्रमाण सामान्यच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तरी देखील कृषी मंत्रालयाने यंदाच्या वर्षी राष्ट्रीय अन्नधान्य उत्पादनाचे उच्चांकी उद्दिष्ट (Monsoon forecast & Crop) नजरेसमोर ठेवून उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या कृषी मंत्रालयाच्या बैठकीत यावर्षीचे अन्नधान्य उत्पादनाचे उदिष्ट्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.
कृषी मंत्रालयाकडून बुधवारी (दि.०३) 'मान्सून, खरीप पीक, आणि उत्पन्न' या संदर्भातील आढावा बैठकीचे (Monsoon forecast & Crop) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यंदाच्या मान्सूनमध्ये २४ पिकांसाठी ३३२ दशलक्ष टन राष्ट्रीय अन्नधान्य उत्पादनाचे उच्चांकी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गतवर्षीच्या तुलनेत आठ दशलक्ष टनांनी (2.5%) अधिक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जूनपासून सुरू होणार्या आगामी खरीप हंगामाच्या तयारी बाबतच्या कृषी मंत्रालयाच्या बैठकीत यंदाच्या उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील पीक वर्षातील उत्पादनापेक्षा यावर्षी उत्पादन उदिष्ट्य अधिक आहे. हे पाऊल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देऊन लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठ केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भागधारकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले आहे.