Latest

Monkeypox Case : दिल्लीमध्ये आढळला ४था मंकीपॉक्स रुग्ण, देशात आतापर्यंत ९ रुग्ण

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनानंतर जगभर भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या मंकीपॉक्स या आजाराचा नवा रुग्ण काल (दि.४) दिल्लीमध्ये आढळला. ३१ वर्षीय महिला असणारी ही रुग्ण परदेशी नागरिक असून दिल्लीमध्ये आढळलेला हा चौथा रुग्ण आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे नऊ रुग्ण आढळले असून सर्व केरळ आणि दिल्ली मधील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णाला तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवले पाहिजे. तसेच त्याचे कपडे, टॉवेल आदी वस्तू इतरांनी वापरू नयेत, जेणेकरून या विषाणूचा प्रसार होणार नाही. याचबरोबर हात धुणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या अँटी-कोविड प्रोटोकॉलचाही या प्रकरणामध्ये मदत होईल.

परदेशी नागरिक असलेल्या महिलेला ताप आणि त्वचेवर जखमा आढळून आल्यानंतर तिला लोकनायक जय प्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये ती पॉसिटीव्ह आढळून अली. सोमवारी (दि.१) पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाला LNJP रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोसिस आहे. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होतो. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असून तो खूपच कमी तीव्र असतो.

मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, शरीरावरील जखम आणि लिम्फ नोड्स सुजणे यांचा समावेश होतो. हा सहसा स्व-मर्यादित रोग असतो तसेच याची लक्षणे दोन ते चार आठवडे टिकतात.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT