Latest

Poonch attack | पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी ऑपरेशन तीव्र, मोबाइल- इंटरनेट सेवा बंद

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाल्यानंतर भारतीय लष्कराने पूर्ण ताकदीने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ही शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

संबंधित बातम्या 

लष्कराने विशेषत: पूंछ जिल्ह्यातील राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात ग्राउंड कोम्बिंग ऑपरेशन्स तीव्र केले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरूवारी दुपारी ३:४५ वाजता धात्यार जवळील वळणावर घेराबंदी आणि शोध मोहिमेसाठी स्निफर डाॅग्जनाही सोबत घेण्यात आले होते.

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने पुंछ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी सोशल मीडियावर या हल्ल्याच्या ठिकाणची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ज्यात अत्याधुनिक यूएस निर्मित M4 कार्बाइन असॉल्ट रायफल्सचा वापर केल्याचे दिसते. M4 कार्बाइन ही १९८० च्या दशकात अमेरिकेत तयार केलेली हलकी, गॅस-ऑपरेटेड मॅगझिन-फेड कार्बाइन रायफल्स आहे. हे अमेरिकेच्या सशस्त्र दलांचे शस्त्र आहे आणि इतर ८० हून अधिक देशांनीदेखील ते वापरासाठी घेतले आहे.

इंडिया टुडे टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील धत्यार वळणाचे ठिकाण दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी निवडले होते. कारण या ठिकाणी वळण आणि खडबडीत रस्त्यामुळे लष्कराची वाहनांचा वेग कमी होतो. दहशतवादी ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यान धत्यार वळणाजवळील एका टेकडीवर लपून बसले होते. तेथून त्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर गोळीबार केला, असे सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील कोटद्वार येथील रायफलमॅन गौतम कुमार (२८) हे दहशतवादी हल्ल्यात शहीद होण्याच्या पाच दिवस आधी १६ डिसेंबर रोजी रजेवरून कर्तव्यावर परतले होते. गौतम कुमार यांचे लग्न ११ मार्च २०२४ रोजी होणार होते. पण या तरुण जवानाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT