Latest

Mahesh Gaikwad firing case : आमदार गणपत गायकवाड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अनुराधा कोरवी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने अटककेतील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची रवानगी आता आधारवाडी तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली आहे. ( Mahesh Gaikwad firing case )

संबंधित बातम्या 

आमदार गायकवाड गेल्या ११ दिवसांपासून पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. १४) रोजी संपल्यानंतर या गुन्ह्यात अटकेत असलेल्या पाच आरोपींना सकाळी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवावी अशी मागणी कोर्टासमोर केली. परंतु, कोर्टाने पोलिसांची मागणी अमान्य करीत त्यांना जेल कस्टडी सुनावली आहे.

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना २ फेब्रुवारी रात्री घडली होती. या घटनेत महेश गायकवाड यांच्यासह त्यांचा मित्र राहुल पाटील या दोघांना गोळ्या लागल्या आहेत. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या गोळीबार प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड, त्यांचा पुत्र वैभव गायकवाड याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवणकर, विकी गणात्रा यांच्यासह आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी आमदार गायकवाड यांना पुन्हा पोलीस कोठडीत देण्याची मागणी कोर्टासमोर केली. मात्र, या घटनेत सर्व तपास झालेला असताना पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही असे मत न्यायालयाने नोंदवत आमदार गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाच्या आदेशानुसार, आता आमदार गायकवाड यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. ( Mahesh Gaikwad firing case )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT