Latest

मिस युनिव्हर्स हरनाज संधूचा शेवटचा अप्रतिम क्षण, स्वत:ला रोखू शकली नाही उर्वशी रौतेला (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताच्या हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स २०२१ चा किताब आपल्या नावे केला. मिस युनिव्हर्सचा मुकूट तिच्या शिरपेचात जाण्यापूर्वीचा सुंदर क्षण व्हायरल होत आहे. केवळ २१ वर्षांची हरनाजने तब्बल २१ वर्षांनंतर हा किताब आपल्या नावे केलाय. मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत तिचं नाव पुकारताचं तिचे चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. भारतासाठी गौरवशाली आणि अभिमानाची ही बाब आहे, जेव्हा भारताच्या हरनाज संधूचे नाव पुकारण्यात आले होते. विशेष म्हणजे, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सुपर जजेसच्या बैठकीत उपस्थित होती. संधूचे नाव पुकारल्यानंतर उर्वशी स्वत: रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

मिस युनिव्हर्स भारताची हरनाज संधूचं नाव घेताचं तेथे उपस्थित असणाऱ्या उर्वशीच्या डोळ्यात पाणी आले. उर्वशी स्वत:ला रोखू शकली नाही. ती परिक्षकांमध्ये उपस्थित होती. उर्वशीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती खूप इमोशनल झालेली दिसते.

harnaaz sandhu

हा व्हिडिओ स्वत: उर्वशीने आपल्या ऑफीशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. तिने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलंय-परीक्षक म्हणून आम्ही योग्य उत्तम निर्णय घेतला आहे. मी स्वत:ला थांबवू शकले नाही. भारत, आम्ही करून दाखवलं.

उर्वशी मिस दीवा युनिव्हर्स २०१५ ची विजेती आहे. २०१५ मध्ये तिने मिस युनिव्हर्स पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर पंजाबच्या संधु पॅराग्वे आणि साऊथ आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकून मिस युनिव्हर्सची विजेती ठरलीय.

१९९४ मध्ये सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स झाली होती. २००० मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स झाली. विशेष म्हणजे ज्यावर्षी लाराला मिस युनिव्हर्सचा किताब मिळालेला त्यावर्षी संधूचा जन्म झाला होता. जिंकल्यानंतर तिने ईश्वर आणि आपल्या आई-वडिलांचे आभार मानले.

हेदेखील वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT